top of page

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. अक्षरवेल मराठी विद्यालय म्हणजे काय?

अक्षरवेल हे आइंधोवन मराठी मित्रमंडळाचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश मुलांना मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेशी जोडून ठेवणे हा आहे.

२. या शाळेचा मुख्य उद्देश काय आहे?

या शाळेत मुलांना प्राथमिक स्तरावर मराठी अक्षरांची ओळख, साधे बोलणे, तसेच वाचन आणि लेखन यांची सुरुवात करून देणे हा उद्देश आहे. मात्र, ही औपचारिक शैक्षणिक शाळा नसून, आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू की मुलांना मराठीची आवड आणि पायाभूत ज्ञान मिळावे.

३. ही शाळा कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे?

साधारणपणे, ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा उपक्रम आहे. आवश्यकतेनुसार गट विभागणी केली जाईल.

४. माझ्या मुलाला/मुलीला मराठी अजिबात येत नसेल तरी चालेल का?

होय, अगदी सुरुवातीपासून शिकवले जाईल. कोणत्याही पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही.

५. शाळा मुलांना काय शिकवेल?

मुलांना अक्षर ओळख, साधे शब्द, छोट्या वाक्यांमध्ये बोलणे, आणि हळूहळू प्राथमिक वाचन-लेखन शिकवले जाईल.

६. ही शाळा कोणती हमी (commitment) देते का?

ही एक समुदाय-आधारित आणि पायलट उपक्रम असल्यामुळे कोणतीही शैक्षणिक हमी देण्यात येत नाही. मात्र, शाळा प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करेल.

७. पालकांची भूमिका काय आहे?

पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. घरात नियमित मराठी बोलणे आवश्यक आहे किंवा तसा प्रयत्न करणे जेणेकरून मुलांना शिकण्यास मदत होईल.

८. वर्गांची पद्धत कशी असेल?

गाणी, गोष्टी, खेळ आणि उपक्रमांद्वारे मुलांना मराठी शिकवले जाईल, जेणेकरून त्यांना शिकण्याची आवड निर्माण होईल.

९. शिक्षक कोण असतील?

शिक्षक स्वयंसेवक असतील आणि बहुतेक शिक्षक Bachelor in Education (B.Ed.) किंवा Early Childhood Education मध्ये पदवीधर असतील.

१०. वर्गाचे वेळापत्रक काय आहे?

वर्ग रविवार या दिवशी सकाळी घेतले जातील. अचूक वेळ आणि तपशील नोंदणीवेळी कळवले जातील.

११. मुलांना शाळेत किती वाजता सोडावे लागेल?

मुलांना सकाळी 09:50 वाजता शाळेत सोडणे अनिवार्य आहे. त्याआधी किंवा नंतर मुलांना सोडू नये.

१२. मुलांना परत कधी घ्यावे लागेल?

मुलांना 11:00 ते 11:10 या वेळेतच परत घेऊन जाणे आवश्यक आहे. हा नियम पाळणे बंधनकारक आहे.

१३. मुलांना Toilet Training असणे आवश्यक आहे का?

होय, सर्व मुलांनी toilet trained असणे आवश्यक आहे.

१४. वर्ग कुठे घेतले जातील?

Eindhoven येथे निश्चित ठिकाणी वर्ग आयोजित केले जातील (तपशील नोंदणीवेळी दिला जाईल).

१५. हा उपक्रम दीर्घकालीन आहे का?

सध्या हा पायलट उपक्रम आहे. प्रतिसाद आणि अनुभवाच्या आधारे पुढील योजना ठरवली जाईल.

१६. नोंदणी कशी करायची?

अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

आइंधोवन मराठी मित्रमंडळ

bottom of page