आइंधोवन  मराठी मित्रमंडळ

दूरदेशीचे आपले माहेर

आइंधोवन मराठी मित्रमंडळ

मराठी संस्कृती आणि परंपरेविषयी जिव्हाळा वाटणाऱ्या लोकांनी, आपल्यासारख्याच लोकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम.

नोकरी, शिक्षण इत्यादी कारणानिमित्त परदेशात आलेल्या मराठी प्रेमिंची, मराठी संस्कृतीशी असलेली नाळ जोडून ठेवण्याच्या उद्देशाने मंडळाची स्थापना झाली.

आपली अभिजात संस्कृती, कला, परंपरा आपल्याबरोबरच आपल्या पुढच्या पिढीला ही पोहोचवावी असा मंडळाचा निखळ प्रयत्न असतो.


गणेशोत्सव, गुढीपाडवा उत्सवा बरोबरच इतर अनेक नवनवीन उपक्रम मंडळ हाती घेत आहे. त्यात अधिकाधिक लोकांचे सहकार्य आणि सहभाग असेल अशी मंडळाला आशा वाटते.